नदीपात्रात मासे पकडायला गेलेल्या तरुणास मगराने नेले खोल पाण्यात, तरुणाचा करुन अंत

0
नदीपात्रात मासे पकडायला गेलेल्या तरुणास मगराने नेले खोल पाण्यात, तरुणाचा करुन अंत 




सिरोंचा  :
नदीपात्रात मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणावर मगरीने हल्ला करून खोल पाण्यात नेउन त्याला ठार केले. ही घटना महाराष्ट्र - छत्तीसगड राज्याच्या सीमेलगत सिरोंचा तालुक्याच्या इंद्रावती नदीपात्रात शनिवार, ७ जून रोजी दुपारी २:००च्या सुमारास घडली.

समित अंबाला (२२, रा. अटूकपल्ली, जिल्हा बिजापूर, छत्तीसगड) असे मृत युवकाचे नाव आहे. सिरोंचा तालुका व छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागूनच इंद्रावती नदी वाहते. सिरोंचा तालुक्याच्या हद्दीत सोमनपल्ली हे गाव आहे. दुसऱ्या बाजूला छत्तीसगड राज्यातील अटूकपल्ली हे गाव आहे. समित अंबाला हा युवक नेहमीप्रमाणे मासे पकडण्यासाठी नदीपात्रात गेला होता.

नदीत जाळे टाकत असताना त्याला मगराने पाय धरुन ओढत नेले तेव्हा अंबाला यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी आरडाओरडा केला आणि तातडीने बचावकार्य सुरू केले. मात्र, तोपर्यंत मगरीने त्याला खोल पाण्यात नेले होते.
घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. त्यानंतर तरुणाचा शोध सुरू केला.
सुमारे तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर गावकऱ्यांनी तरुणाचा मृतदेह नदीबाहेर काढला. मगरीच्या हल्ल्यामुळे तरुणाचा उजवा पाय फॅक्चर झाला होता. अचानक मगरीने त्याच्यावर हल्ला केला. मगरीने त्याचा उजवा पाय पकडून पाण्यात ओढले अश्या प्रकारे त्यांचा करुन अंत झाला आहे

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !