देसाईगंज येथे युवकाची गळफास घेऊन केली आत्महत्या

0
देसाईगंज येथे युवकाची गळफास घेऊन केली आत्महत्या




देसाईगंज :-
 येथिल 23 वर्षीय युवकाने गळफास घेऊन  आत्महत्या केल्याची घटना आज दि. ०८ जून २०२५ ला सकाळी ११.०० वाजताच्या दरम्यान उघडकिस आली.
सविस्तर व्रुत्त असे की, देसाईगंज शहरातील नैनपुर वार्ड येथील रहिवासी दिपक दत्तू चौधरी या  23 वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरीच सकाळच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना घडली. दिपक हा नजिकच्या बैद्यनाथ कंपनीत कामावर जात होता. त्याने गळफास लावले तेव्हां त्याचे आई वडील व अन्य जन शेतावर धानाचे भारे बांधण्याकरीता गेले होते असे विश्वासनिय सूत्राद्वारे कळले. 
 याबाबतची माहिती देसाईगंज पोलिसांना मिळताच पोलिसांनी लगेच घटना स्थळ गाठून प्रेत खाली उतरवून पंचनामा केला व शवविच्छेदन करण्यासाठी  ग्रामीण रुग्णायल देसाईगंज येथे पाठविले.शवविच्छेदना नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला पुढील तपास पोलीस निरीक्षक अजय जगताप यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !