लोह खनीज वाहतूक करणाऱ्या ट्रकने गडचिरोली येथे इंदीरा गांधी चौकात दुचाकीस दिली धडक एक इसम ठार

0
लोह खनीज वाहतूक करणाऱ्या ट्रकने गडचिरोली येथे इंदीरा गांधी चौकात दुचाकीस दिली धडक एक इसम ठार 




गडचिरोली - सुरजागड येथून लोह खनीज भरून येणारी ट्रक इंदिरा गांधी चौकात विरुद्ध दिशेने येणारी दुचाकीला जब्बर धडक दिल्याने एक इसम जागीच ठार झाला व एक किरकोळ जखमी झाल्याची घटना दि २५ मे ला घडली 

आज दिनांक 25 मे सांयकाळी 6.30 चे दरम्यान सुरजागड वरून लोह खनीज घेऊन छतीसगड जाणारा ट्रक चामोर्शी रोड ते धानोराकडे जात असतांना आरमोरी वरून धानोरा रोडकडे जाणाऱ्या दुचाकीला चौकातच धडक दिल्याने गणेश चौधरी नामक इसम वय 28 वर्ष राहणार मुल हा ट्रकच्या चाकात अडकला व जागीच ठार झाला. आज रविवार बाजार असल्यामुळे सिग्नल बंदच होते.

इंदिरा गांधी चौकात बघ्यांची तुफान गर्दी जमली होती. ट्राफीक जॉम झाली होती. ड्रायव्हर स्वतः पोलीस स्टेशन गडचिरोली येथे जमा झाला.

सत्ताधारी पक्षाचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे आपल्या असंख्य कार्यकर्त्या सोबत पोलस स्टेशन गाठले ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे यांच्या सोबत चर्चा करून दर रविवारी ट्राफीक
पोलीस ठेवा यापुढे असे अपघात घडता कामा नये सुरजागडच्या ट्रकाने अनेकांचा जिव घेतला. मी
स्वतः जातीचे लक्ष घालणार, एक महिन्यानंतर मोठा स्टॉप कर्मचारी येणार आहेत असे ठाणेदारांनी
उपस्थितांना सांगीतले. ठाणेदार सिंगनजुडे सोबत बातचित करतांना भाजपाचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे शिवसेनेचे नेते (शिदे गट) हेमंत जम्बेवार, रिपाईचे नेते प्रा. मुनिश्वर बोरकर व विवेक धोंगडे आदि होतो. उद्या जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सुरजागडे लोह खनीजाचे ट्रक या मार्गाने बंद करू. पोलीसांनी आवागमन करणाऱ्या गाड्यांच्या स्पिडवर नियंत्रण ठरवावे

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !