आष्टी पोलीसांनी गोवंश तस्करी करणाऱ्या आयशर ट्रकला केले जप्त
आष्टी:-
कत्तलखान्यात गोवंशांना नेत असलेला आयशर ट्रकला आष्टी पोलीसांनी ताब्यात घेऊन गोवंशाची सुटका केली
आष्टी कडून तेलंगणात जात असलेला ट्रक क्रमांक एम एच ३४ बी जी २२७९ यास तपासणी केली असता ४८ जनावरे दाटीवाटीने कोंबून नेत असल्याचे दिसून आले ट्रकला जप्त करुन चौकशी केली तर मोहम्मद शकील मोहम्मद समीम वय ३३ रा.नेवादा पो.कुतिल्या जि.प्रतापगड (उत्तरप्रदेश),खदीर रजाक शेख वय २५ रा.धानोरा ता.केरामेरी जि आसिफाबाद (तेलंगणा) अश्या दोन आरोपी विरोधात कलम ३२५,३(५)बि एन एस सहकलम ५(अ)(१) महाराष्ट्र पशू संरक्षण अधिनियम सहकलम ३,११(१)(ड) आदि कलमासह गुन्हा दाखल करण्यात आला आहे गोवंश व ट्रकची किमत असा १२,४०,००० एकुण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे

