धम्म चेतना बौद्ध समाज मंडळ आष्टी कडून विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
आष्टी:-
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील धम्म चेतना बौद्ध समाज मंडळ यांचे वतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली
धम्मध्वजाचे ध्वजारोहण मंडळाचे अध्यक्ष कवडूजी डोर्लीकर यांचे हस्ते करण्यात आले
यावेळी धम्मचेतना बौध्द समाज मंडळाचे सचिव अशोक खंडारे, उपाध्यक्ष प्रा.बोरकर, अशोक साव, तुकाराम दुर्योधन, अनील पाटील, तावाडे, महिला मंडळाच्या अध्यक्षा ममता साव, सचिव सौ.सुनतकारी, ज्वाला पाटील, तेजराज गोंगले, पिनाकपाणी मेश्राम, संध्या हाळके, तारा मोटघरे, विद्या खंडारे, रजनी बावणे, चोखाजी उंदिरवाडे, आदिंसह बहुसंख्य बौद्ध उपासक व उपासीका उपस्थित होते
यावेळी श्रावस्थी खंडारे व पिहू दुर्गे यांनी बाबासाहेबांच्या अनुयायांना समुह नृत्य करुन मंत्रमुग्ध केले
कार्यक्रमाचे संचालन कवडू बावणे यांनी तर आभार प्रदर्शन मुरमाडे यांनी केले