महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय आष्टीला नॅक मूल्यांकन मध्ये बंद दर्जा ( Grade B )

0
महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय आष्टीला नॅक मूल्यांकन मध्ये ब दर्जा ( Grade B )


अशोक खंडारे/ मुख्य संपादक

आष्टी:-
वनवैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचालित व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली सलग्नित,
महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय आष्टी. येथे 21 आणि 22 डिसेंबरला नॕक मूल्यांकन समितीने अध्यक्ष डॉ. सिल्वराजन एकंबरम. निवृत्त प्राध्यापक अन्नामलाय विद्यापीठ, कुडडलोर , तामिळनाडू . समितीचे समन्वयक डॉ. दिवाकर सिंग राजपूत. (अधिष्ठाता) हरित सिंग गौर विद्यापीठ, सागर.(म. प्र) समितीचे सदस्य डॉ.श्रीरामलु चिट्ठीभोईनी. प्राचार्य, विज्ञान महाविद्यालय चिटुर. आंध्र प्रदेश यांनी प्रत्यक्ष भेट देऊन महाविद्यालयात असलेल्या भौतिक, शैक्षणिक, ग्रंथालय विभाग आणि क्रीडा विभाग सुविधा आणि संसाधनाचे मूल्यांकन केले. त्याचप्रमाणे अध्ययन -अध्यापन पद्धती, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, महाविद्यालय विभागवार भेटी. आदिवासी जिल्ह्यातील संस्कृतीचे प्रत्यक्ष दर्शन आदिवासी गोंडी नृत्यातून घडविण्यात आले. इत्यादी गोष्टींचे प्रत्यक्ष सूक्ष्म अवलोकन करून महाविद्यालयाचं मूल्यांकन केल्या गेले. वरील सर्व बाबींचा महाविद्यालयाचा अहवाल दृक-श्राव्य पद्धतीने नॕक मूल्यांकन समितीने बेंगलोरला पाठविल्यानंतर. महाविद्यालयाला नॕक मूल्यांकन परिषदेकडून सीजीपीए 2.35 (ग्रेट 'बी') मिळवत सुयश प्राप्त केलेले आहे. महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयाचे NAAC cycle - 1 होते. परंतु प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रम आणि SSR च्या सात criteria (निकषांचे) शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेले विश्लेषण आणि अद्यावत दस्तावेज तयार करून समितीच्या पुढे प्रस्तुत करण्यात आले. ज्यांच्यामुळे हे यश संपादन करता आले असे, वन वैभव शिक्षण मंडळ अहरीचे उपाध्यक्ष, आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री. बबलू भैयाजी हकीम. सौ शाईन भाभीजी हकीम. प्रा. छोटू भैयाजी हकीम (सदस्य. वन.वै.शि. मं.) प्राचार्य. लीना पठाण . (सदस्य, वन.वै.शि.म.) सर्व व्यवस्थापक मंडळाचे पदाधिकारी, महाविद्यालय विकास समितीचे पदाधिकारी, गोंडवाना विद्यापीठाच्या मानव-विज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. चंद्रमौली सर या सर्वांचे मार्गदर्शन आणि सहकार्य तसेच महाविद्यालयातील प्रवेशित विद्यार्थी, माजी- विद्यार्थी आणि पालक वर्ग या महाविद्यालयातील सर्व घटक वर्गांचे सहकार्य, वेगवेगळ्या महाविद्यालयातील प्राध्यापक, मित्रपरिवार यांच्याकडून मिळत असलेले मार्गदर्शन आणि सहकार्यामुळेच महाविद्यालयाला एक उच्च शिक्षणातील राष्ट्रीय स्तरावरील नॕक मूल्यांकन परिषदेकडून सन्मानकारक दर्जा प्राप्त करता आला.
महाविद्यालयाच्या मूल्यांकनासाठी प्राचार्य डॉ. संजय फुलझेले यांच्या नेतृत्वात IQAC समन्वयक प्रा. रवी गजभिये, IQAC सहसमन्वयक डॉ. गणेश खूणे, डॉ. राजकुमार मुसने, डॉ. भारत पांडे, डॉ. रवी शास्त्रकार, डॉ. श्याम कोरडे, प्रा. ज्योती बोभाटे, प्रा. बल्की प्रा. मयूर बारापात्रे, प्रा. गबने , राजकुमार लखमापुरे (मुख्यालिपीक) निलेश नाकाडे (वरिष्ठ लिपिक) आय. आर. शेख (कनिष्ठ लिपिक) लोमेश गुटके , एम.डी. मुस्ताक , दिलीप मडावी. संजीत बच्छाड, संतोष बारापात्रे. अतुल लटारे ,अलीउल्ला खान पठाण, जोहर खाँन. लखन कुमार महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी मूल्यांकन प्रक्रियेमध्ये मोलाचा वाटा पार पाडल्याबद्दल प्राचार्य डॉ. संजय फुलझेले यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक करत अभिनंदन केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !