दुर्गंधीयुक्त झाले नाल्याचे पाणी, पशुपालक झाले चिंतातूर
मृत बायलर कोंबड्या नाल्यात फेकल्याने पाणी झाले दुर्गंधीयुक्त
आष्टी :-
चामोर्शी तालुक्यातील आष्टी- अनखोडा मार्गावरील नाल्यात मृत बायलर कोंबड्या पोत्यात भरून फेकल्याने नाल्यातील पाणी दुषित झाले असून दुर्गंधी सुटली आहे. याचा त्रास या मार्गावरून ये जा करणाऱ्या नागरीक, तसेच नाल्याला लागून असलेल्या शेतकऱ्यांना होत आहे. तसेच जनावरे सुद्धा हे दुर्गंधीयुक्त पाणी पीत नसल्यामुळे ती तहानलेली आहे. जर पाणी पिलेच तर यामुळे त्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.
मृत बायलर कोंबड्या गावापासून दूर जंगलात फेकण्याऐवजी त्या नाल्याच्या पाण्यात फेकल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात असून या मृत कोंबड्या ज्यांनी फेकल्या त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच आष्टी नजीक असणाऱ्या पोल्ट्रीफॉर्म व्यावसायिकांना याची सक्त ताकीद देण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे

