राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवा निमीत्य आष्टी ग्रामीण रुग्णालयात फळ व बिस्किटे वाटप
श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था व जिजाऊ लेकी समुह यांचा उपक्रम
आष्टी:-
राजमाता जिजाऊ जन्मोत्सव साजरा करीत असताना आष्टी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळं व बिस्किटे श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था व जिजाऊ लेकी समुह आष्टी यांचे वतीने वाटप करण्यात आले
१२ जानेवारी हा राजमाता जिजाऊ यांच्या जयंती सर्वत्र मोठ्या थाटात साजरी करण्यात येत असते त्याच अनुषंगाने श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टी व जिजाऊ लेकी समुह आष्टी यांनी जिजाऊ जन्मोत्सव थाटामाटात साजरा केला यावेळी पदाधिकारी पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते

