अनाथ शबनमला पोलीसांनी लग्नासाठी दिला मदतीचा हात

0
अनाथ शबनमला पोलीसांनी लग्नासाठी दिला मदतीचा हात


भामरागड:-
येथील पोलीसांनी अनाथ शबनमला लग्नासाठी मदतीचा हात दिला आहे.
शबनम ही लहानशी असतांनाच  तिच्या आईला देवाज्ञा झाली, तेव्हापासून तीचे संगोपन आजी करीत होती कोरोनाच्या महाभयंकर आजाराने वडिलांचे क्षत्र हरविले अश्या परिस्थितीत आजीचा तिला आधार होता यातच तिचे लग्न जुळले मात्र तिच्या कडे लग्नकार्य करायचंय पण कसे करायचे ह्या विवंचनेत असतांना पोलीस तिच्या मदतीला धावून आले
भामरागड पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून नेहमीच विविध योजनांचा लाभ देत आहेत
भामरागड परिसरात गोरगरीब जनतेला सतत मदतीचा हात देत असतात त्याचप्रकारे निराधार शबनमचे लग्न १२ जानेवारी ला नियोजित केला आहे अशी माहिती भामरागड चे प्रभारी अधिकारी  शरद मेश्राम याना होताच पोलीस स्टेशन मधील अधिकारी, अंमलदार, पोलीस,व सीआरपीएफ चे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने मदत गोळा करून अनाथ शबनमला  तिच्या घरी पोहचून १८२०० रुपये मदत दिली व लग्नकार्य करण्यास हातभार लावला 
अनाथ शबनमला लग्नासाठी मदतीचा हात दिला म्हणून भामरागड पोलिसांचे सर्वत्र कौतुक केले जाते आहे

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !