आष्टी पोलीस स्टेशन येथे रेझिंग डे सप्ताहाचे आयोजन

0
आष्टी पोलीस स्टेशन येथे रेझिंग डे सप्ताहाचे आयोजन



अशोक वासुदेव खंडारे /मुख्य संपादक 

आष्टी:-
 दि ४ जानेवारी ला पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधून व पोलीस - जनता संबंध दृढ करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलामार्फत, पोलीस दादा लोरा खिडकी उपक्रमांतर्गत दि.02 जानेवारी ते 08 जानेवारी या कालावधीत *रेझिंग डे सप्ताह* चे आयोजन पोलीस स्टेशन आष्टी येथे करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून दि .४ जानेवारी ला पोलीस स्टेशन आष्टी येथे कार्यक्रम घेण्यात आला.
  रेझिंग डे सप्ताहाचे अनुषंगाने महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातील विद्यार्थ्यांची "रस्ता सुरक्षा ,व्यसनमुक्ती तसेच महिला सुरक्षा" या विषयांवर आधारित महात्मा जोतिबा फुले हॉयस्कूल आणि महाविद्यालय आष्टी या शाळेपासून ते आंबेडकर चौकातून पोलीस स्टेशन आष्टी पर्यंत सर्व प्रथम रॅली काढण्यात आली. त्यानंतर पोलीस स्टेशन ची ओळख करून देण्यासाठी पोलीस स्टेशन आष्टी येथे *पोलीस स्टेशन मधील विविध कक्षाची ओळख* , *"रस्ता सुरक्षा मार्गदर्शन*, " *शस्त्र प्रदर्शन* " व *शस्त्र पाहणी* या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक कुंदन गावडे, परी.मपो.उप. भाग्यश्री जगताप, परी. मपो.उप.प्रतिक्षा वणवे , पो.उप.मंडल व सर्व अंमलदार तसेच महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय ,आष्टी येथील विद्यार्थी व सोबत शिक्षक वृंद उपस्थित होते. गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रश्न मांडून त्याचे निरसन करून घेतले व पोलीस दलाने राबविलेल्या कार्यक्रम बद्दल विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !