महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे ही काळाची गरज -सलिमा मणेरी

0

महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे ही काळाची गरज -सलिमा मणेरी



मंगळवेढा -:
महिला आज सर्वच क्षेत्रात पुढे येतआहेत ही कौतुकास्पद बाब असली तरी त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन वर्ल्ड वाईड उद्योग समूहाच्या मंगळवेढा तालुका प्रमुख सलिमा मणेरी यांनी केले
             कंपनीच्यावातीने मंगळवेढा येथे आयोजित केलेल्या महिला व शेतकरी सशक्तीकरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी कंपनीचे पश्चिममहाराष्ट्राचे प्रमुख भगवान पवार यांच्यासह वरिष्ठ उपस्थित होते. मंगळवेढा येथील माळी गल्ली येथे तालुक्यातील पहिल्या उद्योग मशीन चे उदघाटन करण्यात आले.
      कंपनीकडून मशीन खरेदीकरिता अर्थसहाय्य देण्यात असून कच्च्या मालाचा पुरवठा करणे व तयार झालेला पक्का माल नेण्याची जबाबदारी देखील कंपनीने घेतली आहे. त्यामुळे घरच्या घरीच महिलांना उद्योग मिळाला असून काम करणाऱ्या प्रत्येक महिलेला महिन्याकाठी तीस ते बत्तीस हजार रुपये मिळणार आहेत. मंगळवेढा शहर व तालुक्यात सदर कंपनीच्या उद्योगाविषयी माहिती समजताच माळी गल्ली येथील कंपनीच्या कार्यालयात महिलांची गर्दी वाढली आहे.
      यावेळी कट्टे उद्योगसमूहाचे प्रमुख संजय कट्टे, धनाजी धनवे, डी के साखरे, औदुंबर लंगडे, निलोफर मणेरी, शुभांगी माळी, नंदा देवकते व वैशाली सावंत यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !