स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करण्यासाठी वाचनालयास स. पो. नि. नितेश गोहणे यांचेकडून स्पर्धा परीक्षेचे पुस्तक भेट
आष्टी:-
पोलीस मदत केंद्र घोट येथील प्रभारी अधिकारी हे नेहमीच परिसरातील विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी , समस्या समजुन घेऊन विद्यार्थ्यांकरिता विविध रचनात्मक उपक्रम, मार्गदर्शन कार्यक्रम राबवत असतात.
काही दिवसापूर्वी घोट येथील छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक वाचनालय येथे पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितेश गोहणे यांनी भेट देऊन तेथील अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना वाचनालयासंबंधीत अडीअडचणी विचारपूस केली असता विद्यार्थ्यांनी वाचनालयात स्पर्धा परीक्षेची पुस्तके कमी असल्याबाबत व अपडेटेड पुस्तके नसल्याबाबत अडचणी मांडल्या तेव्हा त्यांनी विद्यार्थ्यांना पाहिजे असलेल्या पुस्तकांची यादी मागितली. व छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक वाचनालयाकरिता सहायक पोलीस निरीक्षक नितेश गोहणे यांचेकडून 5000 रुपयाचे विविध स्पर्धा परीक्षेची पुस्तके गडचिरोली येथून बुक डेपो मधुन विकत घेऊन वाचनालयाकरिता भेट देण्यात आले. तसेच पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवाराकरिता गोळाफेक मैदान सुद्धा तयार करून देण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक वाचनालयाकरिता आज रोजी पोमके घोट कडून स्पर्धा परीक्षेची अपडेटेड व विद्यार्थ्यांना हवी असलेली पुस्तके घेऊन दिल्याने व गोलाफेक मैदान तयार करून दिल्याने तेथील विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच गडचिरोली पोलीस दलाचे व प्रभारी अधिकारी सपोनि नितेश गोहणे यांचे मनापासून आभार मानले व वाचनालयाकरिता अशीच मदत व मार्गदर्शन करावे असे उपस्थित विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

