नागपूर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी घावी व कुटुंबीयांना ५० लाखांची तातडीची मदत करा - विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

0

नागपूर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी घावी व कुटुंबीयांना ५० लाखांची तातडीची मदत करा - विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार


नागपूर :-
नागपुरात आज अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून सोलार इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. नागपूर-अमरावती रोडवर बाजारगाव येथे ही कंपनी आहे. या कंपनीत स्फोट झाला असून या प्रकरणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची तातडीची मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला कंपनीने नोकरी द्यावी अशी मागणी केली आहे.
 
विजय वडेट्टीवार यांनी 'एक्स'वर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की,संरक्षण दलासाठी ड्रोन आणि स्फोटके तयार करणारी 
नागपूर येथील कंपनी सोलार इंडस्ट्रीज मध्ये झालेल्या स्फोटात ६ महिलांसह ९ लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. दुर्घटनेतील मृतकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची तातडीची मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला कंपनीने नोकरी द्यावी ही आमची मागणी आहे.

कंपनी व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली आहे. यापूर्वी सुद्धा अश्या घटना सदर कंपनीत घडल्याची माहिती पुढे येत आहे. तसेच कंपनीमुळे परिसरातील पर्यावरणाचे होत असलेले नुकसान ही गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. 
सरकारने या संपूर्ण प्रकरणाची दखल घेऊन एसआयटी स्थापन करावी आणि दोषी असलेल्या कंपनी व्यवस्थापनावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !