संतांचे विचार समाजाला दीपस्तंभा सारखे' दत्तात्रय महाराज क्षिरसागर

0
' संतांचे विचार समाजाला दीपस्तंभा सारखे'  दत्तात्रय महाराज क्षिरसागर 


आरमोरी:-
 वारकरी संप्रदायातील संत ज्ञानेश्वर, जगद्गुरु तुकाराम, संत संताजी जगनाडे महाराज व इतर वारकरी संप्रदायातील महाराष्ट्रातील  इतर संतांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा व सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी खर्ची घातले तत्कालीन समाजाला सन्मानाने जगण्याचा मार्ग सांगून परमेश्वर भक्तीचे आत्मज्ञान जागृत करण्याचा प्रयत्न केला म्हणून संतांचे विचार समाजाला दीपस्तंभा सारखे ठरतात असे प्रतिपादन दत्तात्रय महाराज क्षिरसागर यांनी  केले.
 कुरखेडा तालुक्यातील कढोली येथे तेली समाजाच्या वतीने  समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दत्तात्रय महाराज क्षीरसागर हे होते प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच भास्कर बोडणे, डॉ. दुर्गादा आकरे, प्राचार्य जी. ई . पडोळे, आसाराम कुरजेकर, जगन्नाथ आकरे, ग्रा.पं. सदस्य चंद्रकांत चौके, किरण चौधरी, सोनू जीटकूटवा, पवार राजेंद्र कुंजेकर, तमुस अध्यक्ष तेजराव रणदिवे, फाल्गुन रणदिवे, फुकटजी गरमडे, पुरुषोत्तम ढवडे, पंढरी रणदिवे, दिलेश्वर कवडकर, प्रा. प्रदीप बोडणे, शालिकराम जनबंधू, तुकाराम ढवडे, उपसरपंच किरण आकरे, जयंत निंबेकर पोलीस पाटील राजेंद्र आकरे,देवानंद आकरे, उद्धव निंबेकर प्रामुख्याने उपस्थित होते.
  कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजाचे सचिव माधव आकरे यांनी केले आभार प्रदर्शन सचिन आकरे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तेली समाजाचे अध्यक्ष मेघराजन टिकले, अविनाश आ, जय कृष्णा निंबेकर, नरेंद्र पडोळे, लुथेश टिकले, देवानंद आकरे, रोहिदास निंबेकर, नरेश पडोळे व तेली समाज बांधवांनी सहकार्य केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !