इंदुबाई या महिलेला मारहाण प्रकरणी खोब्रागडे दाम्पत्याला अटक

0
इंदुबाई या महिलेला मारहाण प्रकरणी खोब्रागडे दाम्पत्याला अटक


बांबूच्या काठीने मारहाणीत महिला गंभीर जखमी, गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल 


 आरमोरी:-
आरमोरी तालुका मुख्यालयाजवळ बर्डी स्थित विद्यानगर येथील फिर्यादी महिला इंदू पुंडलिक कुंभारे वय 47 धंदा मजुरी ही चोपकार वकिल यांचे तहसील कार्यालय समोर आरमोरी येथील कार्यालयामध्ये जाण्याकरीता निघाली असता तिचे घराचे समोर राहत असलेले प्रमोद हरिपाल खोब्रागडे वय 52 व त्याची पत्नी चित्रा प्रमोद खोब्रागडे राहणार विद्यानगर बर्डी हे आडवे होवून सन २०१८ मधील दिलेली रिपोर्ट जील्हा न्यायालयात चालत आहे. ती केस मागे घे , तसेच तुझ्या भावाच्या जागा विक्रीचे कागदपत्रावर सही का मारीत नाही? कोणतीही गोष्ट मुलाला व इतरांना का सांगितले ? असे म्हणून यातील आरोपी खोब्रागडे दांम्पत्यानी बांबुच्या काठीने इंदू पुंडलिक कुंभारे ला पाठीवर, पायावर, हातावर जबर मारहान करून गंभीर जखमी केले व जिवानिशी ठार मारण्याचा धमकी दिली. व शिवीगाळ करून, तुला घरात राहू देत नाही अशी धमकी दिली. सदर घटना ही दिनांक 8/12/2023 ला सायंकाळी 6:00 ते 7.00 वाजताच्या दरम्यान घडली असून, अशा फिर्यादीच्या बयाणा वरून पोलीस स्टेशन आरमोरी येथे प्रमोद हरिपाल खोब्रागडे व पत्नी चित्रा प्रमोद खोब्रागडे यांच्यावर ४१५/२०२३ कलम ३४१, ३२४, ५०४, ५०६, ३४ भा.द.वि. अन्वये गुन्हा नोद दिनांक 12/ 12/2023 ला सायंकाळी 7: 17 अटक करून तपासात घेतला आहे.
         सदर गुन्हयातील जखमी महिला नामे इंदु पुंडलिक कुभारे वय ४७ वर्षे रा. आरमोरी विदयानगर हिचे शारीरीक मारहान संबंधाने सामान्य रूग्णालय गडचिरोली येथे उपचार घेत असून त्यांचे कडून वैद्यकिय अहवाल प्राप्त झाला आहे. जखमी महिलेला "खादयांला व पायाला गंभीर मार असून फॅक्चर झाले आहे.त्याचे ऑफरेशन करणे गरजेचे आहे. तसेच सदरचा मार हा ३ ते ६ महिने कालावधी पर्यंत बरा होण्याकरीता लागेल" असा अभिप्राया वरून जखमी महिलेला जिवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून येत असल्याने गुन्हयामध्ये कलम ३०७ भा.द.वि ही वाढ करण्यात आली असून, आरोपी खोब्रागडे दाम्पत्यास गुन्हयात अटक केले आहे. व दिनांक १५/१२/२०२३ पावेतो पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत.
        सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस अधीक्षक निलोत्फर उप विभागीय पोलीस अधिकारी भुजबळ यांच्या मार्गदर्शनात आरमोरी ठाण्याचे ठाणेदार संदीप मंडलिक पोलीस स्टेशन आरमोरी करीत आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !