शासकीय आश्रमशाळा रेगडी येथील विद्यार्थ्यांना मिळतोय निकृष्ट दर्जाचे जेवण
अधिक्षक, मुख्याध्यापक यांच्या संगनमताने विद्यार्थ्यांच्या जीवाशी चाललाय खेळ
अशोक वासुदेव खंडारे / मुख्य संपादक वैनगंगा वार्ता
शासकीय आश्रमशाळा रेगडी येथील विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जिल्हा गडचिरोली अंतर्गत येत असलेल्या शासकीय आदिवासी आश्रम शाळा रेगडी येथे आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे.आदिवासी विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहण्यासाठी सकस आहार देण्याची नितांत गरज असताना तेथील स्थानिक प्रशासनाने निकृष्ट जेवू देऊन विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात घालण्याचा प्रकार सुरू आहे
जेवन, आरोग्य व शैक्षणिक बाबी करीता आदिवासी विभागामार्फत करोडो रुपयांचा निधी खर्च केला जातो. परंतू रेगडी येथील शासकीय आश्रम शाळेत उच्च दर्जाच्या तांदळाच्या नावाखाली निकृष्ट दर्जाचे तांदळाचा भात देण्यात येतो. हा सर्व तांदूळ रेशन दुकानातील असण्याची शक्यता नाकारता येत नाही.तसेच दुय्यम दर्जाचे व कालबाह्य झालेले भाजी उपयोगी साहित्य (तिखट,हळद , मसाले) वापरल्या जातात.यामुळे तेथे विद्यार्थ्यांना विषबाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हा सगळा प्रकार या शाळेतील मुख्याध्यापक व अधिक्षक यांच्या संगनमताने चालू आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी चालू असलेला खेळ थांबवून मुख्याध्यापक व अधिक्षक यांना निलंबित करण्याची मागणी विद्यार्थ्यांचे पालक वनागरिकांनी केली आहे.
ह्या सगळ्या प्रकरणाबाबत मा.प्रकल्प अधिकारी यांना संपर्क साधला असता त्यांना संपर्क होऊ शकला नाही

