महिला उद्योजकांच्या कार्यशाळेला महीलांचा उस्फुर्त प्रतिसाद
राजुरा विधानसभेतील पाच हजार महिला होणार उद्योजक
गोंडपिपरी:-
गाव माझा उद्योग फाउंडेशन चे मुख्य c m d पवन वानखेडे यांच्या पुढाकारातून महाराष्ट्रातील 12 लाख महिलांना उद्योजक बनविण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून आज दिनांक 17 रोज रविवारला गाव माझा उद्योग फाउंडेशन च्या माध्यमातून राजुरा,बल्हारशाहा,अहेरी,गडचिरोली या चार विधानसभेची संयुक्त एक दिवसीय उद्योग कार्यशाळा गोंडपीपरी येथील वी तू नागापुरे डीएड कॉलेज येथे संपन्न झाली
.कार्यक्रमाचे उदघाटक तथा मुख्य मार्गदर्शक (RM) सीमा उईके , अध्यक्ष (ARM) जसवंत बहादूरे ,प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार राजकपूर भडके, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नथुजी गोडशेलवार,उपसरपंच संजय मेश्राम,राजुरा विधानसभा कार्डनेटर कांताताई भडके,सारिका कालर, घुग्गुसच्या श्रीमती गोडसेलवार, सांगडे आदींची मंचावर उपस्थिती होती.याप्रसंगी सीमाताईनी आपल्या मार्गदर्शनातून महिलांचे मार्मिकतेने ब्रेनवाश करून संपूर्ण प्रोजेक्ट महिलांसाठी अगदी आपलेसा करून घेतला . शासनाच्या अशा अनेक योजना आहेत की ज्या ग्रामीण भागातील महिला पर्यंत अजूनही पोहचल्या नाहीत. त्याच योजना शासन स्तरावर पाठपुरावा करून त्या ग्रामीण भागातील महिलांपर्यंत कशा पोहचवता येतील या करिता आम्ही कटीबद्द झालो असून ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान उंचावण्याचा संकल्प घेत गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रात काम सुरू केले आहे . बहादूरे यांनी सुद्धा उदघाटकांच्या नंतरचा उर्वरित संपूर्ण भाग त्यांनी अगदी वृदयातून स्पष्ट केला,इतर मान्यवरांनी दोन दोन मिनिटात आपल्या मनोगतातून प्रकाश टाकला ,प्रास्ताविकेतून भडकेनी सुद्धा कवी सुरेश भटांच्या चार ओळीतून महिलांची मने जिंकलीत
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गडचिरोलीच्या सी सी समीक्षा झाडे यांनी केले तर आभार राजुरा विधानसभा सी सी कुंदाताई कोंडेकर यांनी मानले.सदर कार्यशाळेला हजारोच्या संख्येनी महिलांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सी सी अनिता वाघमारे,दिपमाला झाडे, आम्रपाली कोसनकर , आश्लेषा चिडे,प्रतीक्षा रायपूरे,ढवस ताई,अनिता निमसरकर, यांनी अथक परिश्रम घेतले.

