आदिवासी गोंड-गोवारी युवा संघटना अडपल्ली चक तर्फे कवी प्रभाकर दुर्गे यांचा सत्कार
अशोक खंडारे मुख्य संपादक
आष्टी :-
आदिवासी गोंड - गोवारी युवा संघटना अडपल्ली (चक) यांच्या वतीने कविवर्य प्रभाकर दुर्गे यांचा सत्कार करण्यात आला आदिवासी गोंड-गोवारी युवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने अडपल्ली चक. ता. मुलचेरा. जि. गडचिरोली येथे दिनांक २८, २९, ३० डिसेंबर २०२३ तिन दिवसीय भव्य कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटक माजी आमदार. दिपकदादा आत्राम, सहउद्घाटक माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. अनिताताई आत्राम, अध्यक्ष सेवा निवृत्त नायब तहसीलदार कुबडे , उपाध्यक्ष विनोद डि. झाडे ( माजी ग्रा.प. सदस्य अडपल्ली माल ). व इतर मान्यवर तसेच होते
समस्त ग्रामवासीयांच्या उपस्थितीत आदिवासी गोंड-गोवारी युवा संघटना व गावकऱ्यांनी या भव्य कबड्डी सामन्याचे औचित्य साधुन त्याच गावी वास्तव्यास असणारे युवा कवी, लेखक प्रभाकर देविदास दुर्गे यांचा साहित्यक्षेत्रातील प्रवास पाहुन आज महाराष्ट्रात विविध ठिकाणी आपल्या नावासह गावचे सुद्धा नाव रोशन केले ही आमच्या गावकऱ्यांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे म्हणून या कार्यक्रमाला लाभलेले उद्घाटक माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा मोठ्या जल्लोषात सत्कार करण्यात आला. या सत्काराबद्दल समस्त गावकरी, मित्रपरिवार, नातेवाईक तसेच साहित्यिक सहकारी त्यांचे मनोबल वाढवत त्यांची प्रशंसा केली आहे

