वेगळ्या विदर्भ राज्यासाठी ॲड.चटप यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राजुरा येथे रास्तारोको

0
 वेगळ्या विदर्भ राज्यासाठी ॲड.चटप यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राजुरा येथे रास्तारोको 


राजूरा:-
स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष ॲड. वामनराव चटप आणि पदाधिका-यांनी नागपूर येथील संविधान चौकात आमरण उपोषण सुरू केले आहे. या मागणीला आणि विदर्भवादी नेते ॲड. वामनराव चटप यांना समर्थन देण्यासाठी शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष व विदर्भ राज्य आंदोलन समिती यांच्या वतीने नागपूर हैद्राबाद मार्गावर वरूर रोड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या. अखेर पोलिसांनी शेकडो आंदोलकांना ताब्यात घेतले.
आज दिनांक 28 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता राजुरा तालुक्यातील वरूर रोड येथे टी पॉईंट वर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडो विदर्भवादी कार्यकर्त्यांनी हा महामार्ग रोखून धरला. या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी संघटनेचे तालुका प्रमुख शेषराव बोंडे, माजी नगराध्यक्ष रमेश नळे, समितीचे विभागीय अध्यक्ष कपिल इद्दे, बाजार समिती संचालक प्रभाकर ढवस, दिलीप देठे, प्रफुल्ल कावळे, मधुकर चिंचोलकर, बळीराम खुजे, आबाजी धानोरकर, घनश्याम पिंपळशेंडे, विलास बोबडे, नरेश गुरनुले, विनायक महाकुलकर, पुंजाराम ठक, बाळू टेकाम, नंदू कुकडे, सुधाकर अमृतकर, भास्कर सिडाम, गजानन ढवस, दिनेश वसाके, शामराव कारेकर, सतीश लोहे, देविदास पडोळे, सौरभ मादसवार, कवडू बरडे, भिवसन गायकवाड, रामदास कोहपरे, वासुदेव ताजने, रवींद्र बोबडे, भास्कर वांढरे, सारंग रामगिरवार, सुरज गव्हाणे, किशोर भेंडे, नरेंद्र मोहारे, सतय्या रामगिरवार, टीकेश्वर लखमापूरे, पुरुषोत्तम अंगलवार, घनश्याम दोरखंडे, मिन्नाथ परसूटकर, बबन देवतळे, सुनील गौरकार, ज्ञानेश्वर बर्डे, विठोबा लोणारे, संजय सबावत यांनी केले. या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले. राजुरा ठाणेदार योगेश्वर पारधी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !