पोर्ला येथील जंगलात आढळून आला अर्धनग्न अवस्थेत तरुणीचा मृतदेह

0
पोर्ला येथील जंगलात आढळून आला अर्धनग्न अवस्थेत तरुणीचा मृतदेह 




गडचिरोली : -
 तालुक्यातील पोर्ला-वडधा मार्गावर पोर्लापासून दीड किमी अंतरावर जंगलात एका अनोळखी युवतीचा मृतदेह शुक्रवारी सकाळी आढळून आला. प्रियकराने गळा दाबून तसेच डोक्यावर वार करून हत्या केली असल्याचा अंदाज आहे. सदर घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली असावी.

पोर्ला येथे रोजगार हमी योजनेचे काम सुरू आहे. कामावर जाणाऱ्या मजुरांना युवतीचा मृतदेह अर्धनग्नावस्थेत आढळून आला. याबाबतची माहिती पोलिसांना दिली असता, पोलिसांनी घटनास्थळ गाठले व पंचनामा केला. युवक व युवती हे दोघेही जंगलात गेले असावेत. युवतीचा खून करण्याचा निश्चय तरुणाने केला असावा. मात्र, ही बाब युवतीला कळू दिली नाही. घटनास्थळी गेल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला असावा. या वादादरम्यान युवकाने युवतीचा गळा दाबून हत्या केली. एवढ्यावरच तो थांबला नाही तर दगडाने तिच्या डोक्यावर वार केला. युवती बेशुद्ध पडल्यानंतर त्या नराधमाने तिच्यावर बलात्कार केला असण्याची शक्यता घटनास्थळावरील स्थितीवरून दिसून येते. मृत युवतीची ओळख पटविण्याचे काम गडचिरोली पोलिसांमार्फत सुरू आहे

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !