लिटील हार्ट्स इंग्लिश मिडीयम स्कूल आष्टी येथे राष्ट्रीय गणित दिवस साजरा
आष्टी:-
येथील लिटील हार्ट्स इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये प्रख्यात भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये गणिताचे मानवतेच्या विकासातील महत्त्व याबद्दल जागृती करणे, गणिताच्या क्षेत्रातील गणितज्ञांचे योगदान ओळखणे आणि त्यांचे कौतुक करणे आणि जीवनातील विविध पैलूंमध्ये गणिताचे महत्त्व वाढवणे हा या दिवसाचा उद्देश होता.
त्यानुषंगाने शाळेत श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच जयंती निमित्ताने इयत्ता ९ वी ची विद्यार्थिनी कु. वैष्णवी तोटावार इयत्ता १० वी तील कु. लक्ष्मी पिंपळकर, कु. विजया सुरजागडे तसेच शंकर वैरागडे, प्रथमेश सल्ला, मुकेश दिवसे, संगम पानघाटे, आकाश गुरनुले, इत्यादी विद्यार्थ्यांनी गणित विषयाबद्दल तसेच गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या आत्मचरित्रावर मनोगत व्यक्त केले. या दिवसाच्या निमित्ताने शाळेतील इयत्ता ७ ते १० वीच्या विद्यार्थ्यांकरिता गणित विषयाची स्पर्धात्मक परीक्षा घेण्यात आली. या स्पर्धेत वर्गानुसार प्रथम व द्वितीय क्रमांक देण्यात आला त्यामध्ये प्रथम क्रमांक इयत्ता सातवीचा विद्यार्थी रुद्रा खांडरे, आठवीतील विद्यार्थिनी कु. सानवी लाकडे, नववीतील कू. वैष्णवी तोटावार, दहावीतील विद्यार्थी शिवम पोलोजीवार तर द्वितीय क्रमांक सातवीचा विद्यार्थी आर्यन मुद्रिकवार, आठवीचा प्रियांशू मडावी, नववीतील कू. अक्षिता पोलंपली, दहावीतील विद्यार्थी शंतनु मानापुरे यांनी पटकाविला.तसेच या विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे देण्यात आले.
यावेळी शाळेतील मुख्याध्यापक कृष्णमुर्थी गादे, संस्थेचे सचिव रमेश आरे, तसेच शिक्षकवृंद राजु रागुला, राजेश खोब्रागडे, मैपाल कोंडापर्ती,. सुरज लोणारे,. सागर कविश्वर,. गुरुदास पुच्चलवार, . नागेश राऊत,. सचिन दुर्गे, प्रवीण निलम,. संदीप झाडे, सौ. प्रतीक्षा अलोणे, सौ. प्रिया बोबाटे, सौ. सुषमा निलम, सौ. मनोरम्मा सोनटक्के, सौ. सरिता गादे, सौ. संगीता दयालवार, सौ. दिपा भट्टाचार्य, सौ. शुभांगी कडतलवार तसेच सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

