BIG BREAKING
पोलीसांच्या हातांवर
तुरी देऊन रूग्नालयातून पसार झाला आरोपी
काही तासातच पोलिसांनी एका घरातून घेतले ताब्यात
कूरखेडा - :
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा पोलीसांच्या ताब्यात असलेला एक आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला मात्र काही तासांतच एका घरातून पोलीसांनी ताब्यात घेतले आहे
कुरखेडा येथील उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकीय तपासणी करीता आणण्यात आलेला आरोपी पोलीसाना चकमा देत पळून गेला होता पोलीसानी यूद्ध स्तरावर शोध मोहीम राबवत अवघ्या काही तासातच काल सोमवार रोजी रात्री त्याला तालूक्यातील एका गावात नातेवाईकाकडे दडून असताना पून्हा अटक केली आहे
आरोपी प्रेमल खेमचंद कराडे वय २२ रा. चन्ना भाकती ता. अर्जूनी मोरगांव जि. गोंदिया याला लैंगिक शोषणाचा आरोपात काल सोमवार रोजी अटक करीत वैद्यकीय तपासणी करीता दूपारी येथील उपजिल्हा रूग्णालयात नेण्यात आले होते यावेळी तपासणी दरम्यान पोटात मळमळ वाटते असे बोलत तो खिडकी जवळ उलटी करण्याचा बहाण्याने जात खिडकीतून उडी घेत पळून गेला होता यावेळी पोलीसानी यूद्ध स्तरावर शोध मोहीम राबवत सर्व संभाव्य ठिकाणी त्याचा शोध घेण्यात आला यावेळी तो कुरखेडा तालूक्यातीलच एका गावात नातेवाईकाकडे दडून असताना अवघ्या काही तासातच पून्हा त्याला अटक करण्यात आली व पोलीसानी सूटकेचा निश्वास सोडला आहे

