BIG BREAKING कारची दुचाकीला जब्बर धडक, दुचाकीस्वार पती-पत्नीचा जागीच मृत्यू

0
BIG BREAKING
 कारची दुचाकीला जब्बर धडक, दुचाकीस्वार पती-पत्नीचा जागीच मृत्यू 




 अज्ञात कार चालका विरूध्द पोलीसांनी केला गुन्हा दाखल.



मंगळवेढा :-
सांगोला महामार्गावरील शेलेवाडी चौकात भरधाव वेगेनॉर कारने दुचाकीला जब्बर धडक दिल्याने दुचाकीस्वार पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला 
 अज्ञात वाहनचालकाविरूध्द मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पळून गेला असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.


या घटनेची हकिकत अशी, दि. 18 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.00 च्या दरम्यान एम एच 06, सी. बी. 6735 या शाईन दुचाकीवरून मृतक विजय मारूती जाधव (वय 40) व त्यांची पत्नी कविता विजय जाधव (वय 35 रा. वाकणवाडी जि. रायगड हल्ली मुक्काम शेलेवाडी) मंगळवेढयाहून बाजार करून शेलेवाडीकडे परतत असताना शेलेवाडी चौक ओलाडतेवेळी सांगोल्याकडून येणारी वेगनॉर कार क्र. के.ए.28 एम ए.2351 वरील अज्ञात चालकाने भरधाव वेगात गाडी चालवून त्या दुचाकी स्वारास जोराची धडक देवून त्यांना गंभीर जखमी करून दोघाच्या मृत्यूस कारणीभूत ठरला असल्याची फिर्याद अजय गोपीनाथ जाधव (वय 19) याने दिल्यावर अज्ञात चालकाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.


अपघातग्रस्त मयत कुटुंबीय हे मूळचे रायगड जिल्हयातील असून उपजिविका करण्यासाठी बावची ता. मंगळवेढा येथे लाकडापासून कोळसे बणविण्याचे काम करीत होते. अपघातानंतर अज्ञात चालक फरार झाला असून पोलिसांनी अपघातग्रस्त कारगाडी जप्त करण्यात आली आहे

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !