तपासात गतिमानता नसल्याने "मायक्रोस्कोप " चोर सापडणार तरी कसे!

0
तपासात गतिमानता नसल्याने "मायक्रोस्कोप " चोर सापडणार तरी कसे!



भांडारपालास तर केले निलंबित परंतू चोरास पकडने दुरचं



गडचिरोली : - 
तपासात गतिमानता नसल्याने मायक्रोस्कोप  चोर कसे व केव्हा सापडणार असा प्रश्न उपस्थित होतो आहे 

प्रशासनासह पोलिसांसमोर आव्हान निर्माण करणाऱ्या  'मायक्रोस्कोप' चोरीप्रकरणत भांडारपाल अशोक पवार याला निलंबित करण्यात आले. मात्र, अद्याप चोर सापडला नसल्याने तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहेत

जिल्हा हिवताप कार्यालयाने एप्रिल महिन्यात मायक्रोस्कोप यंत्रांची खरेदी केली होती. साठा नोंदवहीत याची नोंदही घेतली होती. २२ पैकी चार नग आरोग्य संस्थांना वितरित केले होते तर १८ नग भांडार विभागात ठेवले होते. दरम्यान, ऑगस्ट महिन्यात ते चोरीस गेले. प्रभारी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. पंकज हेमके यांनी या प्रकरणात भांडारपाल पवार यांच्यावर निष्काळजी व हलगर्जीचा ठपका ठेवत २१ सप्टेंबर २०२३ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली. याचा पवार यांनी खुलासाही दिला होता. परंतु आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खास मर्जीतील असल्याने भांडारपाल पवार यांची पाठराखण केल्या जात होती. मीडियांनी हे प्रकरण लावून धरल्यानंतर अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निर्देशानुसार डॉ. हेमके यांनी पवार याला निलंबित केले. परंतु अद्यापही चोराचा पत्ता लागलेला नाही.

 खरच चोरी की आणखी काही ?

हिवताप विभागातून यापूर्वीही 'मायक्रोस्कोप' चोरी गेले होते. त्यानंतर भांडार शाखेत सुरक्षेबाबत प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक होते, पण पुन्हा पाच लाखांचे 'मायक्रोस्कोप' चोरीस गेले. चोरीच्या घटनेनंतर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. परंतु आजपर्यंत हे उपाय का केले गेले नाहीत, असाही प्रश्न उपस्थित होतो आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !