माजलगाव ::-
दगडाने डोक्यावर मारुन नातवाने आपल्या आजीचा खून केल्याची धक्कादायक घटना माजलगाव तालुक्यातील लोणगाव येथे घडली आहे.
(दि.२३) सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
माजलगाव तालुक्यातील लोणगाव येथील मृतक कौशल्याबाई किसन राऊत (वय ७२) याचा नातु राहुल बाळासाहेब राऊत (वय २९) याच्याशी घरात किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर भयंकर भांडणात झाले. याचा राग मनात धरून राहुल याने आजी कौशल्याबाई राऊत यांच्या डोक्यात दगड मारुन खून केला. त्यानंतर कौशल्याबाई यांचा मृतदेह माजलगाव ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे. आईचा खून केल्याप्रकरणी मुलाच्या विरोधात बाळासाहेब राऊत यांनी दिंद्रुड पोलीस ठाण्यात धाव घेतली असून नातवाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

