राज्य उत्पादन शुल्क निरिक्षकानी केली बनावट दारूसह तस्कराला अटक

0
राज्य उत्पादन शुल्क निरिक्षकानी केली बनावट  दारूसह तस्कराला अटक



एक लाख सोळा हजार रुपयाची बनावट दारू जप्त 

वरोरा:-
चंद्रपूर जिल्ह्यात बनावट दारूचा किफायतशीर व्यवसाय फोफावत आहे. त्यावरून वरोरा राज्य उत्पादन शुल्क निरीक्षकांनी कारवाई करत बनावट दारूची तस्करी करणाऱ्या अनिलसिंग अजबसिंग जुनी उर्फ पिंटू सरदार आणि आशिष पुरुषोत्तम मडावी या दोघांना अटक केली. त्यांना 24 नोव्हेंबर रोजी सकाळी आनंदवन चौक वरोरा येथून वाहनासह अटक करण्यात आली. या कारवाईत आरोपींकडून 90 मिलीच्या देशी दारूच्या 1 लाख 16 हजार रुपयांच्या 600 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. गुन्हा नोंदवून न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीला ३ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
 ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त अनिल चासकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील,नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली वरोरा निरीक्षक विकास थोरात, सचिन पोलेवार, द्वितीय निरीक्षक भगीरथ कुळमेथे, सहायक द्वितीय निरीक्षक जगदीश मस्के, जवान-नि.चालक विलास महाकुलकर यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !