एकाचा मृत्यू तर दोन जखमी
घोट : :-
घोट- चामोर्शी मार्गावर सायंकाळी ५ वाजता दोन मोटार सायकलची समोरा समोर धडक झाल्याने एकाचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले.
नित्यानंद बिश्वास वय ६० रा. गोविंदपूर ता. मुलचेरा असे चामोर्शी तालुक्यातील अपघातातील मयताचे नाव असून अशोक नारायण खोब्रागडे वय ५० रा.माडे मुधोली टोला ता. चामोशी, कल्पना शेखर बेपारी वय ४५ रा. विक्रमपूर ता. चामोर्शी हे जखमी आहेत. विश्वास हे शेतकरी होते तर खोब्रागडे हे मेकेपल्ली ता.चामोर्शी येथील जि.प. शाळेत शिक्षक आहेत.
बिश्वास हे दुचाकीवरुन (एमएच ३३ पी- ४८९१) चामोर्शी वरून घोटकडे येत होते तर खोब्रागडे हे दुचाकीवरुन (एमएच ३३ एच- ८९४७) घोटहून चामोर्शीला जात होते. अपघाताची माहिती मिळताच प्रभारी अधिकारी नितेश गोहणे यांनी घोट पोलिस मदत
केंद्राच्या पोलिसांना घटनास्थळी पाठविले घटनास्थळी पोलिसांनी पोहचून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जखमींना तातडीने चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात पाठविले.
अशोक खोब्रागडे यांना गंभीर इजा असून कल्पना बेपारी या किरकोळ जखमी आहेत. अपघातात दोन्ही दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावेळी नागरिकांनी गर्दी केली होती. घोट पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने हटवून मार्ग वाहतुकीसाठी खुला केला, या मार्गावर रहदारी वाढली असून दिवसेंदिवस अपघातात भर पडत आहे

