इलूर येथील सहा वर्षांच्या चिमुरडीचा खड्यात बुडून मुत्यू

0
इलूर येथील सहा वर्षांच्या चिमुरडीचा खड्यात बुडून मुत्यू 




आष्टी (अशोक खंडारे):-
आष्टी पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या इल्लूर येथील एका सहा वर्षांच्या चिमुरडीचा खड्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दि. सहा जुलैमध्ये ला दुपारचे १.३० वाजताचे सुमारास घडली 
सविस्तर वृत असे की, इलूर येथील दोन मुली घराशेजारील खड्याकडे सौचास गेल्या होत्या त्यावेळी पाण्यात उतरत असताना श्रद्धा हिचा तोल जाऊन पाण्यात पडली पाणी जास्त असल्याने तीला बाहेर निघता आले नाही व ती बुडून गतप्राण झाली तेव्हा सोबत असलेल्या मुलीने आरडाओरडा केल्याने शेजारच्या लोकांनी धाव घेतली परंतू तिचा जीव गेला होता 
श्रद्धा हीची आई मीणा बालाजी मडावी यांनी पोलिस स्टेशन आष्टी येथे माहीत दिल्यावरुण आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल काळे हे आपल्या चमूसह घटना स्थळी दाखल होऊन पंचनामा करुन मृत पावलेल्या चिमुकल्या मुलीला शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले 
अधिक तपास पोलीस निरीक्षक विशाल काळे या़च्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलिस करीत आहेत
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !