दोन भामट्यांनी तिन बेरोजगार तरुणींना नौकरीचेआमिष दाखवून ५ लाख ४० हजार रुपयांनी लुबाडले
आरोपींनवर गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
गडचिरोली – जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नौकरीचे आमिष दाखवून तीन बेरोजगार तरुणींना ५ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोन भामट्या आरोपींवर गडचिरोली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत विविध पदांवर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या बनावट स्वाक्षरी आणि शिक्क्यांचा वापर करून खोटे नियुक्ती आदेश देणाऱ्या दोन भामट्यांविरुद्ध गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक’ यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
माहे सप्टेंबर २०२५ ते दिनांक ०५/०७/२०२६ दरम्यान, आरोपी देवानंद बापुजी उराडे वय ५५ वर्षे, रा. इंदिरानगर, गडचिरोली आणि राकेश प्रमोद मुंगेलवार वय २९ वर्षे, रा. न्यू बुद्धीस्ट कॉन्व्हेंट स्कूलजवळ, कॅम्प एरिया, गडचिरोली यांनी संगनमत करून सुजाता रमेश बारशिंगे रा. महागावबोरी, जि. गोंदिया, श्वेता देवराव उसेंडी रा. येरकड, ता. धानोरा आणि प्रगती अंबादास वैरागडे रा. नवेगाव, जि. गडचिरोली यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानात अनुक्रमे सफाई कामगार, कक्ष सहाय्यक आणि जी.एन.एम. (GNM) या पदांवर नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले देऊन त्यांच्याकडून ५ लाख ४० हजार रुपये घेऊन फसवणूक केली
सदर आरोपींनी मुख्य कार्यकारी अधिकारी गडचिरोली जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या बनावट सही व शिक्का मारुन गैरव्यवहार केला त्यांनी सुजाता, श्वेता, प्रगती यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानात सफाई कामगार, कक्ष सहाय्यक व जि एन एम (स्टाफ नर्स)या पदावर नौकरी लावून देण्याचे आश्वासन देऊन पाच लाख चाळीस हजार रुपये आँनलाईन व रोख स्वरूपात लुबाडले खोटे व बनावट आदेश देऊन आर्थिक व मानसिक फसवणूक केली
हा प्रकार लक्षात येताच त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली अश्या भामट्यापासून जिल्ह्यातील नागरिक व सुशिक्षित बेरोजगारांनी सावध रहावे असे आवाहन गडचिरोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी केले आहे

