गडचिरोली जिल्हा परिषदेच्या नावाने परिचर पदाचे आदेश अनधिकृत झाले निर्गमित

0
गडचिरोली जिल्हा परिषदेच्या नावाने परिचर पदाचे आदेश अनधिकृत झाले निर्गमित ?


अनधिकृत आदेश देणारा हा इसम कोन याचा शोध घेणार काय जि.प. प्रशासन 




गडचिरोली :- येथील जिल्हा परिषदेच्या नावे परिचर पदाचे आदेश निर्गमित करण्यात आले असल्याचे निदर्शनास येताच जिल्हा परिषद प्रशासन सतर्क झाले असल्याचे खात्रीलायक वृत्त समोर आले आहे 
जिल्हा परिषदेतील परिचर (शिपाई) भरतीची बनावट जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची घटना ताजी असतानाच, आता जिल्हा परिषदेच्या नावाने थेट परिचर (शिपाई )पदाचे बनावट नियुक्तीपत्र देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे जिल्हा परिषद प्रशासनात खळबळ उडाली असून, नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरुद्ध कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद शाळांमध्ये मासिक २२ हजार रुपये मानधनावर भरती होणार असल्याची बनावट जाहिरात सोशल मीडियावर प्रसारित झाली होती. त्यावेळी जिल्हा परिषद प्रशासनाने ती जाहिरात पूर्णपणे खोटी असल्याचे स्पष्ट करून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले होते. मात्र, ही घटना शांत होत नाही तोच आता आणखी गंभीर प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणात एका उमेदवाराला जिल्हा परिषद, राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि कथित निवड समितीच्या नावाने कंत्राटी परिचर (शिपाई) पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले. या बनावट नियुक्तीपत्रात जिल्हा परिषदेचे अधिकृत लेटरहेड, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच इतर अधिकाऱ्यांचे शिक्के आणि स्वाक्षऱ्यांची हुबेहूब नक्कल करण्यात आली आहे. एवढेच नव्हे, तर संबंधित उमेदवाराला विशिष्ट तारखेला सेवेत रुजू होण्याचे निर्देशही या आदेशात देण्यात आल्याने फसवणुकीचा प्रकार अधिक गंभीर मानला जात आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी संबंधित नियुक्तीपत्र पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे. जिल्हा परिषदेमार्फत सध्या कोणतीही भरती प्रक्रिया सुरू नसल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी खरा गुरू कोण आहे याचा तपास सुरू असल्याचे बोलले जात आहे
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !