समवयस्क दोन तरुणांनी आपल्याच वयाच्या तरुणास चाकूने केले सपासप वार

0
समवयस्क दोन तरुणांनी आपल्याच वयाच्या तरुणास चाकूने केले सपासप वार


गंभीर जखमी तरुण चंद्रपूर रुग्णालयात उपचारासाठी दाखल 

दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात 

मुल:-
 समवयस्क दोन तरुणांनी आपल्याच वयाच्या तरुणास चाकूने सपासप वार करुन गंभीर  जखमी केल्याची घटना मुलं तालुक्यातील गडीसुर्ला येथे घडली.
  सुजान विनोद बुबडे वय १९ असे गंभीर जखमी तरुणाचे नाव असून जीवघेणा हल्ला करणाऱ्या राजू चचणे वय १९, गणेश अशोक शेंडे वय १९ असे आरोपींचे नावे आहेत
 जुन्या वादातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. रात्री आठ वाजताच्या सुमारास गावातील पाण्याच्या टाकीजवळ राजू चचणे व गणेश शेंडे यांनी सुजान यांच्या पाठीवर व पोटावर चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी केले. जखमी सुजल बुबडे यांना मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर चंद्रपूरच्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.  घटनेची माहिती मिळताच मुल पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास मुल पोलीस करीत आहेत

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !