वर्धापन दिनानिमित्त गडचिरोली येथे राज्यस्तरीय कवीसम्मेलन व पुरस्कार वितरण सोहळा

0
वर्धापन दिनानिमित्त गडचिरोली येथे राज्यस्तरीय कवीसम्मेलन व पुरस्कार वितरण सोहळा 


सोपानदेव म्हशाखेत्री / उपसंपादक वैनगंगा वार्ता

गडचिरोली:-
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचार मंच महाराष्ट्र रत्नागिरी भारत च्या  वर्धापन दिनानिमित्त गडचिरोली जिल्हा व चंद्रपूर जिल्हा तसेच नागपूर विभागीय कमिटी अंतर्गत गडचिरोली येथे जिल्हा को-ऑपरेटिव्ह बँकेचे सभागृहात दिनांक 14 11 2023 रोजी सकाळी साडेदहा ते पाच वाजेपर्यंत राज्यस्तरीय कवी संमेलन व राज्यस्तरीय राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांचे हस्ते आयोजित केला आहे 
.या आगळ्यावेगळ्या राज्यस्तरीय कवीसंमेलनाला संस्थापक अध्यक्ष मनोज जाधव सर सहसंस्थापिका व संपादिका भावनाताई खोबरागडे मुख्यत्वे उपस्थित राहणार असून उद्घाटक माननीय प्रंचीत सावकार पोरेड्डीवार अध्यक्ष जिल्हा को-ऑपरेटिव्ह बँक गडचिरोली, प्रमुख मान्यवर रोहिदास राऊत ज्येष्ठ पत्रकार तथा आंबेडकरी विचारवंत, कुसुमताई अलार्म ज्येष्ठ साहित्यिका गडचिरोली गजानन  मद्देशावार कवी गझलकार जेष्ठ साहित्यिक चंद्रपूर ,अनंत साळवेजी मानद सचिव जिल्हा को-ऑपरेटिव्ह बँक गडचिरोली ,चुडारामा बल्लारपूरे जेष्ठ साहित्यिक गडचिरोली, विजय बनसोड  नागपूर विभागीय अध्यक्ष दि  बुध्दीष्ठ सोसायटी ऑफ इंडिया, वसंतराव साठवणे माजी केंद्रप्रमुख भंडारा इत्यादी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार असून कार्यक्रमाध्यक्ष मनोज जाधव  संस्थापक अध्यक्ष, भावनाताई खोब्रागडे सह संस्थापिका व संपादिका, सोपानदेव मशाखेत्री स्वागताध्यक्ष, प्राध्यापक प्रशांत खैरे  कवी संमेलनाचे अध्यक्ष राहणार असून कवी साहित्यिक मान्यवर बंधू-भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने कवी संमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचार मंच जिल्हा गडचिरोली चंद्रपूरच्या वतीने करण्यात येत आहे

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !