चौडमपल्ली येथे स्विफ्ट कार मध्ये आष्टी पोलीसांनी पकडली अवैध देशी दारू

0
चौडमपल्ली येथे स्विफ्ट कार मध्ये आष्टी पोलीसांनी पकडली अवैध देशी दारू


दोन लाख छान्नव हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त, आरोपी ताब्यात

आष्टी:-
देशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या स्विफ्ट कारला चौडमपल्ली येथे आष्टी पोलीसांनी नाकाबंदी दरम्यान पकडून आरोपीला अटक केली आहे
दि.आठ नोव्हेंबर ला रात्री ८.०० वा . गोपीनाथ सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चौडमपल्ली येथे नाकेबंदी दरम्यान स्विफ्ट कार क्र.एम.एच.४३ एन ४७२ ला अडवून तपासणी केली असता ४ गाण्यांमध्ये १२० निपा आढळून आल्या त्याची किंमत ९६००० रुपये व स्विफ्ट कार किंमत दोन लाख रुपये असा एकूण दोन लाख छान्नव हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चालक प्रफुल्ल दाजगाये वय ४० रा.चंद्रपूर याला ताब्यात घेऊन अप क्र. २८४/२०२३ कलम ६५ (अ) मु.दा.का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दयाल मंडल करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल,अप्पर पोलीस अधीक्षक चिंता,यतीश देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक दयाल मंडल,पोशी अतुल तोडासे,रायशीडाम, संतोष नागुलवार,मेदाडे यांनी केली आहे

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !