सिरोंचा :
सिरोंचा- आसरअल्ली नॅशनल हायवे क्रमांक ६३ महामार्गाचे बांधकाम सुरू होऊन ४ ते ५ वर्षे पूर्ण होत आहे, सिरोंचा ते वडदाम गावाजवळ पर्यंत रस्त्याचे कामे झाल्याचे दिसून येत आहे, या महामार्गाचे कामे प्रशांत कन्स्ट्रक्शन नागपूर यांच्या तर्फे करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.
सिरोंचा - आसरअल्ली गावापर्यंत सुरू असलेल्या महामार्गाचे बांधकाम वडदाम गावापर्यंत झाल्याने पुढे आसरअल्ली गावापर्यंत कामे होण्याचे बाकी आहे.या अर्धवट महामार्गाचे कामामुळे तालुक्यातील सिरोंचा मुख्यालयात येणं जाणं करणाऱ्यांना महामार्गावरील असलेल्या खड्ड्यात पडून अनेक अपघात होत आहेत,
महामार्गावर टर्निंग येथे आवश्यक तिथे गतिरोधक (सूचना फलक) नसून गरिबांचे जीव गमवावे लागत आहे. ह्या गंभीर विषयांवर सामाजिक कार्यकर्ते ,आम्ही ग्रामस्थांना घेऊन तहसील कार्यालय मार्फत सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय सिरोंचा यांच्याकडे ६ मार्च 2023 रोजी निवेदन दिले होते
सिरोंचा आसरअल्ली महामार्गावर आरडा, लंबडपल्ली, तुमनूर सह जिथे आवश्यक तिथे गतिरोधक लावण्यात यावे होणारा अपघात टाळता येईल अशी विनंती केली. मात्र सिरोंचा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडून आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्या जात आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग सिरोंचा अभियंत्याच्या दुर्लक्षपणामुळे सिरोंचा आसरअल्ली महामार्गावर आरडा राजचपल्ली येथे (गतिरोधक) नसून ८ सप्टेंबर 2023 रोजी ट्रक व दुचाकीचा अपघातात राजनपल्ली गावाचे जेष्ठ नागरिक राजन्ना कंबाला या ईसमाचा देखील मृत्यू झाला आहे आणि दुसन्या दिवशी आसरअल्ली येथून सिरोंचा मुख्यालयात येत असताना दुचाकीचे एकच दिवशी दोन अपघात होऊन गंभीर जखमी देखील झाले आहेत. असे अनेक अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या दुर्लक्षीतपणामुळे अर्धवट कामे झालेल्या महामार्गावर पुढेही अनेक अपघात होऊन गरिबांचे जीवे गमावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महामार्गाचे अपुर्ण कामामुळे आणि आमच्या मागणीची दखल होत नसल्याने प्रशांत कन्स्ट्रक्शन नागपूर यांच्यावर मनुष्यवादाचे गुन्हा दाखल करून त्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा
दाखल करून त्यांना कार्यकारी अभियंता पदावरून निलंबित करण्यात यावे.
आज पर्यंत महामार्गावर झालेल्या आणि होणाऱ्या अपघाताचे महामार्गाचे कामे करणाऱ्या प्रशांत कन्स्ट्रक्शन नागपूर आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांचेकडून अपघातात जखमी झालेल्या कुटुंबियांना 5 लाख रुपये, तसेच मृतक कुटुंबियांना 10 लाख रुपयाची आर्थिक नुकसान भरपाई मिळवून देण्यात यावी, मागण्या पूर्ण न झाल्यास येत्या १५ दिवसात राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अतुल गण्यारपवर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष-फाजील पाशा तसेच उपाध्यक्ष सागर मूलकला पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच बाधित कुटुंबियांना घेऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तहसीलदार सिकतोडे
यांच्या मार्फत जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे निवेदन देण्यात आले त्यावेळी जिल्हा सरचिटणीस चौक्कमवार, सचिव-विनोद नायडु अल्पसंख्याक आघाडीचे सलमानशेख, सडवली मेडीजेल, राजकुमार मूलकला, गणेश सॅन्ड्रा,उदय मूलकला, सचिन जनगाम, आणि बाधित कुटुंबातील सदस्य आदी उपस्थित होते

