आरमोरी:-
आरमोरी तालुक्यातील नागरवाही येथील एका विवाहितेने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे मृतक महिलेचा नाव सौ. वैशाली माणिक मडावी वय ३९ रा . नागरवाही असे आहे
सविस्तर वृत्त असे की, वैशाली माणिक मडावी ही बऱ्याच दिवसा पासून पोटाच्या आजारांनी त्रस्त होती गेल्या पाच महिन्यांपूर्वी तीचे खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. परंतू तिला पोटाचा त्रास असल्याने ति नेहमी त्रस्त असायची पती माणिक मडावी हे काही कामा निमीत्य नागपूरला गेले असता घराय सासू व सासरेच होते दोघेही झोपेत असतांना वैशालीने वरच्या मजल्यावर जाऊन गळफास घेतला व आपली जिवन यात्रा संपविली सकाळी गावात ही माहिती वाऱ्यासारखी पसरली तेव्हा पो.पा. कुमरे यांनी आरमोरी पोलीसांना दुरध्वनी व्दारे घटनेची माहिती दिली त्या आधारे आरमोरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले प्रेताचा पंचनामा केला व उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा सामान्य रुग्नालय आरमोरी येथे पाठविले पुढील तपास आरमोरीचे पोलीस निरीक्षक मंडलिक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक सुनघाटे व पोलिस हवालदार माडे करीत आहेत.

