जीवलग मित्राच्या बहीणीवर प्रेम करणे बेतले जीवावर

0
जीवलग मित्राच्या बहीणीवर प्रेम करणे बेतले जीवावर 




गोदिया:-
 आपल्या जीवलग मित्राने बहीणीवर प्रेम करणे हे खटकल्याने चाकुने भोकसून मीत्राला ठार केल्याची घटना कुडवा येथे घडली आहे 
प्रेमात माणूस आंधळा होऊन बसतो असे म्हणतात. त्याला खाण्या-पिण्याचे, कामाचे भान राहत नाही असेही म्हणतात. यावेळी त्याला कोणी समजावले किंवा योग्य सल्ला दिला तरी त्याला तो चुकीचा वाटतो. प्रज्वलंच्या बाबतीतही तसेच घडले. त्याला प्रेयसीच्या भावाने बहिणी पासून दूर राहण्याचा सल्ला दिला. पण प्रेमात वेडा झालेल्या प्रज्वलने त्या धमकी वजा सल्ल्याला फारसे गांभीर्याने घेतले नाही. इथेच त्याने चूक केली आणि जीव गमावून बसला.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार प्रज्वल अनिल मेश्राम आणि संकेत बोरकर चांगले मित्र होते. एकमेकांच्या घरी जाणे होत होते तेव्हा संकेतची बहिण आणि प्रज्वलचे एकमेकांप्रती आकर्षक वाढले त्यातच त्यांचे प्रेम जुळले त्यांचे मोबाईल वर बोलणे सुरू झाले. ही बाब संकेतच्या लक्षात आल्यावर त्याने प्रज्वलला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर देखील प्रज्वल आणि संकेतच्या बहिणीचे मोबाईल वर बोलणे सुरूच होते.

आज संकेतने त्याचा मित्र आदर्श भगत याला घेऊन डॉ. आंबेडकर चौक, गोंडीटोला रोड, कुडवा येथे राहत असलेल्या प्रज्वलच्या घरी गेला आणि त्याला बाहेर बोलावून समजावण्याचा प्रयत्न केला. यावरून त्यांच्यात वाद झाला. पाहता पाहता हा वाद विकोपाला गेला. आणि संकेतने जवळ असलेल्या चाकूने प्रज्वला भोकसले त्यातच प्रज्वलचां मृत्यू झाला.

भावाने आपल्या मित्राला पुन्हा समजावण्याचा प्रयत्न केला. यावरून दोघांत वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने भावाने मित्राचा खून केला. ही घटना शहरातील डॉ. आंबेडकर चौक, गोंडीटोला रोड, कुडवा येथे सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. एका प्रेम प्रकरणाच्या या रक्तरंजित अंताची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी संकेत बोरकर (२०) व आदर्श भगत (२०) या दोघांना ताब्यात घेतले आहे

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !