प्रियकरास लग्नाची घातली गळ , त्याने म्हटले नाही, कुठेही जाऊन मर, तिने उचलले टोकाचे पाऊल

0
प्रियकरास लग्नाची घातली गळ , त्याने म्हटले नाही, कुठेही जाऊन मर, तिने उचलले टोकाचे पाऊल


पुणे :-
 प्रेयशीने आपल्या प्रियकराला लग्नाची गळ घातली मात्र त्यांने स्पष्टपणे नकार दिला म्हणून प्रेयसीने टोकाचे पाऊल घेत आत्महत्या केली 
  एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीला तिच्या घरातून पळवून नेले व तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवले. नंतर प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने १९ वर्षीय तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली. आरोपी प्रियकर आदित्य अशोक जाधव (रा. राजुरी, ता. पुरंदर) याच्यावर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी उरुळी देवाची येथे घडली.

याविषयी आत्महत्या करणाऱ्या
तरुणीच्या ५२ वर्षीय वडिलांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि आरोपी आदित्य जाधव हे एकाच गावातील रहिवासी आहेत. पीडितेने आदित्यकडे लग्नाबाबत विचारणा केली असता, 'तुला काय करायचे ते कर किंवा कुठेही जाऊन मर, मी तुझ्याशी लग्न करणार नाही,' असे बोलून तिला मानसिक त्रास दिला.
मुलगी उरुळी देवाची येथे मामाच्या घरी गेली. तिने मामाच्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. अधिक तपास लोणी काळभोर चे पोलीस करीत आहेत

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !