अल्पवयीन युवती आजाराने गेली डॉक्टरकडे मात्र डॉक्टरानै केले भलतेच .....

0
अल्पवयीन युवती आजाराने गेली डॉक्टरकडे मात्र डॉक्टरानै केले भलतेच .....



आलापल्ली:-
आजारी असल्याने उपचारासाठी आलेल्या अल्पवयीन युवतीला वेगळेच स्पर्श केल्याचे आरोपावरुन एका खासगी डॉक्टरवर गुन्हा नोंद झाला. अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे २६ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. पोलिसांनी संबंधित डॉक्टरला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, संतोष मदेर्लीवार असे त्या डॉक्टरचे नाव आहे. आलापल्लीत त्याचा खासगी दवाखाना आहे. अहेरी तालुक्यातील १७ वर्षीय युवती २६ नोव्हेंबरला दुपारी त्याच्या दवाखान्यात उपचारासाठी आली. यावेळी एक रुग्ण महिला बाहेर बसलेली होती. दालनात तपासणीसाठी गेल्यावर डॉ. संतोष मदेर्लीवारने वेगळाच स्पर्श केला, असा आरोप युवतीने केला. नातेवाईकांसह तिने अहेरी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.
त्यावरुन अहेरी  पोलीसांनी रात्री विनयभंग व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा नोंद केला. पोलिस निरीक्षक मनोज काळबांडे यांनी तपासचक्रे फिरवून तातडीने डॉ. संतोष मदेर्लीवारला अटक केली.

न्यायालयीन कोठडीत रवानगी :

दरम्यान, २७ नोव्हेंबरला आरोपी डॉ. संतोष मदेर्लीवारला पोलिसांनी अहेरी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली. अधिक तपास सुरु असल्याचे पोलिस निरीक्षक मनोज काळबांडे यांनी सांगितले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !