चक्क पोलीस अधीक्षकांकडे गाय चोरीला गेल्याची तक्रार
मुर्तिजापूर:-
लहानपणापासून पालन पोषण आपण आपल्या लेकरांचे करतो त्याच प्रमाणे गाईचे पालन पोषण केले व मोठी झाल्यावर तिला काही चोरट्यांनी चोरुन नेले म्हणून हताश होऊन चक्क पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या कडे गाय चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली आहे
मूर्तिजापूर शहरातील जुनी वस्ती परिसरातील रहेमत नगर या भागातील गाय गोठ्यातून चोरी गेल्याने हतबल झाले होते त्यामुळे तक्रारदाराने चक्क अकोला पोलीस अधीक्षक संदीप घुगे याच्या कडे तक्रार दाखल केली आहे. गोठ्यात बांधून ठेवलेली गाय चोरी झाल्याची घटना 23 नोव्हेंबर रोजी रात्री घडली आहे. विशेष म्हणजे सर्वप्रथम तक्रारदार चोरीची तक्रार घेवून शहर पोलीस ठाण्यात गेले असता ठाण्यातील पोलीस कर्मचारऱ्याने त्याला हाकलून लावल्याचे सांगितले जात आहे. पोलीस अधिक्षक यांनी गाय मालक नासिर खान यांनी दिलेली तक्रार नमूद केले आहे
23 नोव्हेंबर रात्रीच्या दरम्यान गाईच्या कोट्याजवळ दोन अज्ञात व्यक्ती फिरत होते अशी चर्चा सकाळी गाय चोरी गेल्यावर होत होती रात्री हे दोन अनोळखी इसम का फिरत होते यावर संशय व्यक्त केला जात असून त्यांच्या तोंडाला कपडा बांधल्यामुळे ओळख पडली नाही. 23 नोव्हेंबर पासून आज पर्यंत गाईचा शोध घेतला असता गायआढळून आली नाही
सदर गाईला लहानपणा पासून ते मोठी होईपर्यंत तिचे पालन पोषण तक्रारदाराने केले होते. आजच्या तारखेत सदर गायची किंमत अंदाजे साठ हजार रुपये आहे अज्ञात चोरट्यांनी सहिवाल जातीची गाय लंपास केली आहे. या संदर्भात नासिर खान यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे लेखी स्वरुपात तक्रार दिली आहे गाईचा शोध घेण्यात पोलीसांना यश येते काय या कडे लक्ष लागले आहे

