विदर्भ राज्य आंदोलन समितीचा २२ नोव्हेंबर ला भंडारा येथील संकल्प मेळावा स्थगीत
गडचिरोली:-
विदर्भ राज्य आंदोलन समिती जिल्हा शाखा भंडारा च्या वतीने दिनांक २२ नोव्हेंबर २०२३ चा भंडारा येथिल नियोजीत विदर्भ निर्माण संकल्प मेळावा विदर्भ राज्य आंदोलन समिती चे भंडारा जिल्हाध्यक्ष तथा मेळाव्याचे आयोजक मा. दिनेशजी काळे यांचे दुःखद निधना मुळे स्थगित करून पुढे घेण्यात येणार आहे याची सर्व पदाधिकारी विदर्भ प्रेमी जनतेने नोंद घ्यावी असे गडचिरोली जिल्हा समन्वयक अरुण पाटील मुनघाटे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

