अहेरी उपविभागातील आरोग्य सेवा कंत्राटी कर्मचारी व अधिकारी यांच्या संपामुळे विस्कळीत

0
अहेरी उपविभागातील आरोग्य सेवा कंत्राटी कर्मचारी व अधिकारी यांच्या संपामुळे विस्कळीत


शासनाने रुग्णांना सोडले वाऱ्यावर , तोडगा काढण्यासाठीचे प्रयत्न सपशेल निर्रथक 

अहेरी:-
गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे कंत्राटी कर्मचारी व अधिकारी यांनी बेमुदत संप पुकारल्यामूळे आरोग्य विभागाची आरोग्य सुविधा कोलमडली असून अहेरी उपविभागातील पाचही तालुक्या सोबतच जिल्हातील प्रा. आरोग्य केंन्द्र शोभेचे वास्तू बनले आहेत. शासनाच्या गोल्डन कार्ड, आभा कार्ड आयूष्मान भारत अंतर्गत पाच लाख रुपये सूरक्षा कवच देणार अशी बढाई मारत आहे पण खरोखरच देणार हे सत्य आहे की जुमलाच होणार की फोल ठरणार हे शंकाच वाटते आहे.
 महाराष्ट्र राज्याचे सर्व कंत्राटी कर्मचारी व अधिकारी हे बेमुदत आपल्या समस्या घेवून संप पुकारला आहे. तरीपण शासन मूंगगिळून आंधळे झाल्याचे सोंग करीत आहे काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे. शासन कोणतेच निर्णय घेवू न शकल्याने आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे.

अहेरी उपविभागातील आरोग्यकेंद्र कमलापूर येथील छल्लेवाडा, राजाराम, खादला,मांडरा, भंगारामपेठा, दामरंचा, या पाच उपकेद्रांचे कर्मचारी बेमुदत काम बंद आदोलन सुरू केल्याने आरोग्य सेवा ठप्प झाली आहे. त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्र कमलापुर अंतर्गत येणारे छल्लेवाडा हा गाव अहेरी तालूकातील तिस-या क्रमांकाचे गाव म्हणून ओळखला जातो येथील लोकसंख्या बघता काही न काही आजाराने छल्लेवाडा येथील उपकेंद्रात प्रति रोज ये-जा राहते, प्रसुतीचे कामे तसेच अनेक रोगराई वगैरे पण सदर उपकेद्राचा पुर्ण कारभार कंत्राटी आरोग्य सेविकेकडे असल्याने व संबधीत कंत्राटी आरोग्य सेविका संपात सहभागी असल्याने छल्लेवाडा येथील आरोग्य सेवा पुर्णपणे बंद झाली आहे त्यामूळे तात्काळ कंत्राटी कर्मचारी याचे संपाचा मार्ग काढुन आरोग्य सेवा सुरळीत करण्याची मागणी छल्लेवाडा गावातील नागरीकांनी केली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !