महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना शाखा आरमोरी चा उपक्रम
आरमोरी:-
आरमोरी तालुक्यातील कोतवाल मधून शिपाई म्हणून नियुक्ती झालेले जयदेव तामसत्वर आणि चंदू मेश्राम यांनी आरमोरी तहसील कार्यालय येथे 13-14 वर्ष कोतवाल म्हणून अविरत सेवा दिली आणि सप्टेंबर 2023 ला पदोन्नतीने शिपाई पदावर नियुक्त झाले.
याचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना तालुका शाखा आरमोरी चे वतीने पदोन्नती झालेल्या कोतवाल कर्मचारी यांचा निरोप समारंभ तथा नव्याने रुजू झालेल्या कोतवालांचा स्वागत समारंभ आरमोरी तहसील कार्यालय येथील सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून तहसीलदार माने आरमोरी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार लालितकुमार लाडे, नायब तहसीलदार धनराज वकुलकर, नायब तहसीलदार हरिदास दोनाडकर, नायब तहसीलदार श्रीमती उत्तरा राऊत , राज्य संघटक तथा जिल्हाध्यक्ष महसूल संघटना चंदुजी प्रधान , अध्यक्ष तालुका पटवारी संघ कात्रतवार दु.निबंधक निबंधक साहेबराव चौधरी, मंडळ अधिकारी वैरागड कुमरे, विदर्भ अध्यक्ष कोतवाल संघटना रवींद्र बोदेले,, विभागीय तंथा जिल्हाध्यक्ष कोतवाल संघटना. कालीदास गेडाम आदी मान्यवर उपस्थित होते,
तालुक्यातील सर्व मंडल अधिकारी, तलाठी,अव्वल कारकून, महसूल सहाय्यक, , शिपाई, कोतवाल कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन आणि आभार गोपाल ठावरे राज्य संघटक तथा तालुका अध्यक्ष कोतवाल संघटना यांनी केले.

