महिला ग्रामसेवीकेचा भाजपा कार्यकर्त्यांकडून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न ?
दहा लाख रुपयांची खंडणीची मागणी
अहेरी :-
एटापल्ली पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या एका महिला ग्रामसेविकेवर अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्नासह अहेरी येथील भाजपाच्या दोन कार्यकर्त्यांनी दहा लाख रुपये खंडणी मागितल्याची लेखी तक्रार एका महिला ग्रामसेविकेने अहेरी पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. या प्रकरणाची योग्य चौकशी करून अहेरी येथील दोघं खंडणी बहाद्दरांवर अनुसूचित जाती-जमाती कायद्यान्वये कारवाई करुन न्याय मिळवून देण्याची मागणीही केली आहे.
महिला ग्रामसेविकेनी अहेरी पोलीस ठाण्यात दिलेल्या लेखी तक्रारीनुसार तक्रारकर्त्या महिला ग्रामसेविका यापूर्वी अहेरी तालुक्यातील खमनचेरु येथील ग्रामपंचायतीमध्ये सन 2011 ते 2022 पर्यंत कार्यरत होती नंतर त्यांची बदली एटापल्ली येथील पंचायत समिती येथे झाल्याने सध्या एटापल्ली पंचायत समितीमध्ये कार्यरत आहेत. अहेरी येथील रवी रत्नय्या नेलकुद्री व प्रशांत नामनवार या दोघांनी महिला ग्रामसेविका खमनचेरु येथील ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेल्या कार्यकाळातील माहिती सध्याचे ग्रामसेवकाडून माहिती अधिकारा अंतर्गत सन 2011 ते 2022 मधील मागितली व या माहितीचा आधार घेऊन त्यांनी याची वरिष्ठांकडे तक्रार करायला पाहिजे होती.
परंतु तसे न करता रवी नेलकुद्री व प्रशांत नामनवारांनी तुमच्या कार्यकाळात भ्रष्टाचार झाले असून तुम्ही आम्हाला दोन लाख रुपये देऊन एक नवीन रुग्णवाहिका घेऊन द्या असे महिला ग्रामसेविकाला वारंवार पैशाची मागणी करीत होते ,नाही दिली तर आम्ही तुमच्या विरुद्ध वरिष्ठांकडे तक्रार करू व सोशल मीडियावर बदनामी करु असेही धमकी देत होते. आणि या दोघांनी जनजागृती नावाचं वाटसप गृपवर ग्रामसेविकेविरुद्ध रोज मॅसेज पोस्ट करून नाहक बदनामी करणे सुरु केले आहे.
दिनांक 5 नोव्हेंबर रोजी आपल्या मुख्यालयी कर्तव्यावर अहेरी येथून एटापल्ली कडे जात असताना जंगल परिसरातील एलचील गावाजवळ रवी नेलकुद्री व प्रशांत नामनवार या दोघांनी रस्त्यात अडवून पैशाची मागणी करत महिला ग्रामसेविकेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यात महिला ग्रामसेविका यांनी आपली दुचाकी वाहन चालूच ठेवून या रस्त्यावरून एक चारचाकी वाहन जात असल्याचे आडोस घेत महिला ग्रामसेविका तिथून कसे बसे निघून गेल्याने त्यांच्यावर अतिप्रसंग करण्याचं प्रयत्न फसल्याचे तिचे म्हणणे आहे. महिला ग्रामसेविका एटापल्ली वरुन परत येऊन अहेरी येथील दोघांविरोधात अहेरी येथील पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे..
सदर तक्रारी संबंधित अहेरी पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

