आष्टी,
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष उद्धवराव झुंगाजी खोब्रागडे यांचे आज दि.५ नोव्हेंबर ला सायंकाळी ७.४५ वा अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ८४ वर्षे होते
उद्धवराव खोब्रागडे यांनी आष्टी येथे सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेची स्थापना केली व गोरगरीब, दिन दुबळ्या लोकांच्या मुलांसाठी शिक्षणाचे दार उघडले
ते रिपब्लिकन पक्षाचे खंदे समर्थक होते समाज सेवा करण्यासाठी ते नेहमी तत्पर होते
त्यांच्या निधनाने आष्टी येथे हळहळ व्यक्त होत आहे
त्यांच्या पार्थिवावर दि ६ नोव्हेंबर ला ११ वा.वैनगंगा नदी वर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून , नातवंडे व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

