भांगडीया फाउंडेशन तर्फे केला आयोजित दिवाळी स्नेहमिलन सोहळा

0
 भांगडीया फाउंडेशन तर्फे केला आयोजित दिवाळी स्नेहमिलन सोहळा 




अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी

नागभिड--:
आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी ट्विंकल इंग्लिश स्कूल, नागभीड येथे भांगडीया फाउंडेशन तर्फे आयोजित दिवाळी स्नेहमिलन सोहळ्याला उपस्थिती दर्शविली. यावेळी सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून विनम्र अभिवादन केले. त्यानंतर उपस्थित तालुक्यातील समस्त भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांशी विविध विषयांवर संवाद साधला आणि सर्व कार्यकर्त्यांचे औक्षण करत शुभेच्छारुपी भेटवस्तू व फराळाचे वितरण केले.

यावेळी मंचावर भाजपा तालुकाध्यक्ष संतोषभाऊ रडके, भाजपा जिल्हा संघटन महामंत्री संजयभाऊ गजपुरे, माजी सरपंच व भाजपा नेता जहाँ गिर भाई कुरेशी,भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंतभाऊ वारजूकर, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजूभाऊ देवतळे, भाजपा ज्येष्ठ नेते मोरेश्वरजी ठिकरे, माजी प्रथम नगराध्यक्ष न.प. नागभीड प्रा. उमाजी हिरे सर, नागभीड कृ.उ.बा. समिती अवेश पठान,उपसभापती रमेश बोरकर, नागभीड कृ.उ.बा. समिती संचालक , नगर परिषद माजी उपाध्यक्ष गणेश तर्वेकर, माजी बांधकाम सभापती न.प. नागभीड सचिन आकुलवार, भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्षा इंदुताई आंबोरकर, माजी भाजपा तालुकाध्यक्ष होमदेव मेश्राम, ईश्वर मेश्राम, विलास दोनाडे, डॉ. मदन अवघडे, आनंद कोरे, बंडू गेडाम, धनराज बावनकर, सुखदेव भाकरे, हरिभाऊ गरफडे तालुक्यातील भाजपा बुथ प्रमुख बहुसंख्येने पुरुष व महिला हजारोच्या  संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !