पुन्हा एकदा आष्टी पोलीसांनी पकडली अवैध देशी दारू, अवघ्या दहा दिवसांत चौथी धडक कारवाई
सहा लाख बारा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त व आरोपीला अटक
अशोक खंडारे / मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९
आष्टी:-
पुन्हा एकदा आष्टी पोलीसांनी अवैध देशी दारू पकडली असून बेलोरो वाहनांसह सहा लाख बारा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
छत्तीसगड व तेलंगणा राज्यात होऊ घातलेल्या निवडणूकच्या अनुषंगाने चोरटी होणारी दारू वाहतूक याची माहिती काढून कारवाई करणे बाबत पोलीस अधीक्षक यांनी आदेक्षित केले असून त्या अनुषंगाने काल 2/11/2023 रोजीच्या रात्री 21.00 च्या सुमारास गोपनीय सूत्राकडून माहिती प्राप्त झाली की, एका चार चाकी बोलेरो वहाणा मधून विधानसभा निवडणुक होत असलेल्या छत्तीसगड राज्यात चामोर्शी ते आष्टी मार्गे चोरटी देशी दारू वाहतुक होणार आहे अशी माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने आंबेडकर चौक येथे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी नाकाबंदी केली असता एक संशयित वाहण TS 19 E 2777 बोलेरो वाहनास अडवून पंचासमक्ष तपासणी केले असता त्यामध्ये देशी दारू 1,12,000/- रूपयांची व वाहन 5 लाख /- रुपये असा एकूण 6, 12,000/- (सहा लाख बारा हजार रुपये) रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे. वाहन चालक तिरुपती नासानी रा. सिरोंचा याचे वरती गुन्हा क्रमांक 280/2023 कलम 65(A) मु. दा. का. अन्वये गुन्हा दाखल करून त्या आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मानकर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही पोलिस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) चिंता , अप्पर पोलीस अधीक्षक (अहेरी विभाग) यतीश देशमुख , उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक मानकर पो. हवा. करमे , पो. शि. राजुरकर, पो. शि. रायसिडाम, पो. शि.संतोष नागुलवार, पो. शि. तोडासे यांनी पार पाडली.

