सिरोंचा येथील शेतकऱ्यांनी ७ दिवसानंतर माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सिस्टीईने उपोषण सोडले

0
 सिरोंचा येथील शेतकऱ्यांनी ७ दिवसानंतर माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सिस्टीईने उपोषण सोडले.


अहेरी:-
सिरोंचा तहसील कार्यालय समोर गेल्या ७ दिवसांपासून शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी उपोषण चालू होते, ह्याची माहिती मिळताच काल सिरोंचा येथे जाऊन माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी आंदोलनकर्त्यांशी बराच वेळ सकारात्मक चर्चा केली, ह्यावेळी शेतकऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन राजेंना दिले, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून लवकरच शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन राजेंनी ह्यावेळी दिल्याने आंदोलकांचे समाधान झाले ह्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले, माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांचा हस्ते उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांना निंबु पाणी पाजून हे आंदोलन संपविले, ह्यावेळी सिरोंचा तालुक्यातील विविध भागांतील शेतकरी तथा भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !