अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
नागभिड येथील बाजार चौकामधील मधुकर डोईजड यांच्या मालकीच्या साई किराणा ॲड जनरल स्टोअर येथून सुगंधित तबांखू विक्रीकरित असल्याचे गुप्त माहितीच्या आधारे नागभिड पोलीसांनी त्यांच क्षणी नागभिडचे पोलीस निरिक्षक योगेश घारे व त्यांच्या चमूनी किराणा दुकानात धाड टाकून 49404 रुपयांचा मुद्दे माल जप्त केला.
त्यात दुकान मालक मधुकर दामोदर डोईजड वय 48 वर्ष याला नागभिड पोलीसांनी ताब्यात घेवून गुन्हा दाखल केला आहे,
अधिक तपास नागभीड पोलीस निरीक्षक योगेश घारे करीत आहेत

