आष्टी येथे लक्ष्मी पूजन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व प्रतिमेसमोर दिवे लावून दिपोत्सव साजरा
अशोक खंडारे/मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९
आष्टी :-
श्री. छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टी च्या वतीने दिवाळी या सणानिमित्त दिनांक १४ नोव्हेंबर २०२३ रोज मंगळवार ला रात्रो ७.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक आष्टी येथे लक्ष्मी पूजन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर दिवे लावून प्रतिमेचे पूजन ग्रामीण रुग्णालय आष्टी चे वैद्यकीय अधिक्षक डॉ.हृषिकेश बरडे , आष्टी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गणेश जंगले , पोलिस उपनिरीक्षक तरारे तसेच माता लक्ष्मीचे विधिवत पूजन आष्टी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक भाग्यश्री जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमा निमित्त आष्टी या परिसरातील नवनियुक्त पोलिस विभागात रुजू झालेले व रुजू होऊन स्व:गावी आष्टी नगरीत पहिल्यांदा आगमन झाल्याने श्री. छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टी च्या वतीने आकाश लोडेलीवार, शिवाजी लोणारे, अंकित उरकुडे,सौरव चरडे ,प्रेम बोरकुटे , चिन्मय भेंडारे ,ललिकेत ताजने , प्रदिप सरकार ,आशिष बोरकुटे ,शिवम बावनकर ,पवन ठुसे , धनराज तिमाडे लक्ष्मण येग्गेवार यांचे पूष्पगुच्छ व श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाला आष्टी पोलिस ठाण्याचे पो. शी. संतोष नागूलवार, बंडू मेदाळे, ग्राम पंचायत सदस्य कपिल पाल,बामनवाडे सर, हरिश्चंद्र बोरकूटे, अनिल कुकुडकर श्री. छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था चे अध्यक्ष पवन रामगिरकर, उपाध्यक्ष संदीप लोढल्लीवार, सचिव संदीप तिवाडे, सहसचिव देवा बोरकूटे कोषाध्यक्ष प्रफुल्ल चतूर, सदस्य अक्षय हनमलवार, आशिष झगडमवार, रुपेश येलमूले, प्रतिक रहाटे , रितीक पांढरमिसे, मनिष घोनमोडे, उत्तम पोरटे, नयन साळवे, सूरज भोयर, आशिष सिरसागर, श्री छत्रपती शिवस्वराज्य संस्थेचे सर्व सदस्य गण व आष्टीतील प्रतिष्ठीत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन कपिल मसराम तर आभार अक्षय हनमलवार यांनी मानले.

