चंद्रपूर:-
प्रेमियुगुलानी विष प्राशन केल्याची धक्कादायक बातमी चंद्रपुर जिल्ह्यातील घुग्घूस येथे घडली आहे.
यात पहिल्यांदा तरुणी चा मृत्यू झाला तसेच उपचार सुरु असताना तरुणाचा सुद्धा मृत्यू झाला आहे.
प्रेम संबंधातून दोघांनीही विष प्राशन केल्याची माहिती समोर आली आहे.
शुभांगी भोंगळे (२४), राकेश जेणेकर (२७) अशी मृतांची नावे आहेत.
मात्र, प्रेम प्रकरणातुन हा टोकाचा निर्णय घेतला असावा का? या दिशेने पोलिस तपास करीत आहेत.या घटनेमुळे सम्पूर्ण परिसर हादरला आहे.
या दोघांनी बुधवारी एकत्र विष प्राशन केले. मात्र मृत्यू वेगवेगळ्या ठिकाणी झाले.
इतरत्र विचारपुस केली असता हे दोघेही प्रेमीयुगुल असल्याची माहिती मिळाली.
विष प्राशन केल्यानंतर शुभांगी हीला चंद्रपुर येथील खाजगी रुग्नालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते दरम्यान मृत्यू झाला तर राकेश ला दवाखान्यात दाखल केल्यानंतर गुरूवारी सायंकाळी उपचारा दरम्यान मृत्यू
झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसानी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

